Headlines

परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्याने केली आत्महत्या‎:खिशात आढळली चिठ्ठी; परभणीत 9 वी आत्महत्या‎




मराठा आरक्षणाचा प्रश्न न‎‎सुटल्याने व ‎‎मनोज जरांगे ‎‎पाटील यांच्या ‎‎‎उपोषणाच्या ‎‎‎पार्श्वभूमीवर‎‎ व्यथित होऊन ‎‎पूर्णा तालुक्यातील‎‎ सुहागन येथील‎ एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने ‎आपल्या शेतातील लिंबाच्या‎ झाडाला गळफास घेऊन ‎आत्महत्या केल्याची घटना‎ घडली. गणेश साहेबराव भोसले ‎असे मृत शेतकऱ्याचे नाव ‎आहे.दरम्यान, मराठा ‎आरक्षणासाठी जिल्ह्यातील‎ही ९वी आत्महत्या आहे.‎ मिळालेल्या माहितीनुसार, १३‎सप्टेंबर रोजी गणेश भोसले शेतात‎ गेले होते. सायंकाळी ५:१५ वाजेच्या ‎सुमारास ते शेतातील आखाड्यावर‎असलेल्या लिंबाच्या झाडाला‎ गळफास घेतलेल्या अवस्थेत‎ आढळून आले. घटनेची माहिती‎ मिळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी‎ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खाली उतरवला. त्या वेळी भोसले‎यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून‎ आली. मृत गणेश भोसले यांच्या‎ खिशात सापडलेल्या चिठ्ठीत,‎‘मनोजदादा जरांगे पाटील हे‎ उपोषणाला बसल्यामुळे व मराठा‎ आरक्षण मिळत नाही म्हणून ‎आत्महत्या करत आहे,” असा ‎उल्लेख आहे. या प्रकरणी मृत ‎भोसले यांचे मेहुणे विनोद लिंबाजी ‎देवरे (रा. थोरावा, ता. वसमत)‎ यांनी दिलेल्या माहितीवरून पूर्णा ‎पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ‎नोंद करण्यात आली आहे. तपास‎ पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलिस ‎करीत आहेत. दरम्यान, मनोज‎ जरांगे हे आत्महत्या करू नका,‎असे वारंवार आवाहन करून सुद्धा ‎जिल्ह्यात आत्महत्या होत‎ आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *