![]()
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबर रोजी मराठा बांधवांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, चांदवड आणि नांदगाव यांसह इतर तालुक्यांतील मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक व पत्रकार परिषद
.
यात नाशिक शहरातील काही मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मुंबईत न जाण्याची भूमिका घेतल्याने समाजात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी एकजूट दाखवत लाखोंच्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ‘नाशिक जिल्हा मराठ्यांचा बालेकिल्ला’ या घोषणांनी लासलगाव परिसर दणाणून गेला.
बैठकीत सोनिया होळकर, भास्कर झाल्टे (नांदगाव), शिवा पाटील सुरासे, मंगेश कदम (निळखेड), अभिजित डुकरे, सुलक्षणा भोसले, भीमराज लोखंडे (मनमाड), केदार नवले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रवीण कदम, प्रसाद फापाळे, राकेश फापाळे, संदीप फापाळे, राजेश भडांगे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील आंदोलनात ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.