Headlines

अपहरणाच्या गुन्ह्याला वेगळे वळण:2 लाखांत सौदा, मुलीचा बालविवाह; पैसे‎न मिळाल्याने नोंदवला अपहरणाचा गुन्हा‎, मुलीच्या शोधासाठी आंदोलनही केले होते पालकांनी‎




बीड तालुक्यातील १४ वर्षीय मुलीच्या ‎अपहरण प्रकरणात पोलिसांच्या तपासात नवा‎ खुलासा झाला. प्रेम प्रकरणातून आधीच पळून ‎गेलेल्या मुलीचा शोध घेऊन तिला पुन्हा त्याच ‎मुलाशी २ लाख रुपयांचा सौदा करून विवाह‎ लावून दिला गेला. मात्र, मुलाने २० हजार‎ रुपये देऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ ‎केली. आई-वडिलांनी बालविवाह केल्याची‎ बाब लपवून ठेवली. मुलीचे अपहरण‎ झाल्याचा गुन्हा नोंद केला. अखेर, अनैतिक ‎मानवी वाहतूक कक्षाच्या एपीआय जनाबाई‎ सांगळे व पथकाने मुलीचा कोल्हापुरात शोध‎ घेतला. मुलाला अटक केली. १४ वर्षीय मुलगी काही महिन्यांपूर्वी‎ गावातीलच एका मुलासोबत प्रेमप्रकरणातून‎ पळून गेली होती. नातेवाइकांनी मुलीचा शोध ‎‎घेऊन तिला परत आणले. त्यानंतर मुलगा व ‎‎मुलगी या दोन्ही बाजूंच्या कुटुंबाची बैठक‎ झाली. मुलाकडून २ लाख रुपये घेऊन मुलीचे ‎‎त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरले.‎त्यानुसार लग्न लावले. मात्र, मुलाने रोख १० ‎‎हजार, ऑनलाइन १० हजार असे केवळ २०‎ हजार रुपयेच सुरुवातीला दिले होते. भीतीपोटी लग्नानंतर पळ लग्न झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाने पैशांसाठी तगादा ‎लावला. कुणीतरी बालविवाहाची तक्रार देऊ असेही म्हटले. मुलगी पुन्हा आपल्यापासून दूर‎ जाईल. या भीतीपोटी एका दिवशी मुलगा व मुलगी दोघेही गाव सोडून निघून गेले. या प्रकरणात आता बालविवाह व‎बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचे‎कलम वाढणार आहे. शिवाय मुलीचे व‎मुलाचे आई-वडील यांनाही आरोपी केले.‎ एएचटीयूने लावला छडा‎ हा गुन्हा महिनाभरापूर्वी अनैतिक ‎मानवी वाहतूक कक्षाकडे ‎तपासासाठी आला. एपीआय ‎जनाबाई सांगळे यांच्या पथकाने‎ तपास करून मुलगी कोल्हापूरमध्ये ‎असल्याचा शोध लावला. एएसआय ‎उषा चौरे, हवालदार प्रदीप येवले,‎अशोक शिंदे, भाऊसाहेब कारले‎ यांनी कोल्हापूरला जाऊन मुलीची‎ सुटका केली. मुलाला ताब्यात घेतले.‎ अपहरणाची दिली‎
होती खोटी तक्रार‎ पैसे न देताच मुलगा मुलीला घेऊन ‎गाव सोडून गेल्याने मुलीच्या‎ आई-वडिलांनी २ फेब्रुवारी २०२६‎ रोजी नेकनूर पोलिस ठाण्यात ‎मुलीचे अज्ञाताकडून अपहरण‎ झाल्याची तक्रार दिली. मुलीचा ‎शोध घ्या म्हणत पोलिसांकडे‎ चकरा मारल्या. आंदोलनही केले. मुलीला नेकनूर येथे आणल्यानंतर तिचा‎ जबाब नोंदवला गेला. या जबाबामुळे ‎बालविवाह झाल्याचे व २ लाखांत सौदा ‎झाल्याचा भंडाफोड झाला.‎‎‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *