Headlines

रांजणगाव पोळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरच्या तरुणाचा मृत्यू:रांजणगाव पोळजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर घटना‎




नागपूर-मुंबई महामार्गावर रांजणगाव पोळजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. विशाल प्रभाकर सपकाळ (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सपकाळ हा वाळूज येथे वास्तव्यास असून एका खासगी कंपनीत काम करत होता. १३ सप्टेंबर रोजी तो वाळूजहून लासूरगाव येथे आला होता. मात्र काही कामानिमित्त तो रात्री पुन्हा दुचाकीवरून वाळूजकडे निघाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास रांजणगाव पोळजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *