Headlines

एमआयडीसी भूसंपादनास गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध:आरापूर एमआयडीसी, उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक‎




गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी‎एमआयडीसी भूसंपादनाला विरोध‎दर्शविला. पथकाने शेतकऱ्यांशी‎संवाद साधला. यावेळी उपविभागीय‎अधिकारी एकनाथ बंगाळे, अमित‎भामरे, आरेफ पठाण, अमर तोरंबे,‎सुदर्शन येलगुटवार उपस्थित होते. गट‎नंबर २६ ते ४३ मधील एकूण १३‎गटांमध्ये फळबागा, कांदाचाळी‎आणि पक्की घरे आहेत. प्रशासनाच्या‎पथकाकडे केवळ शेतजमिनीची नोंद‎होती; पक्की घरे, फळबागा आणि‎शाळेची कोणतीही शासकीय नोंद‎नसल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला.‎ शेतकऱ्यांच्या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवणार‎ यावेळी गणपत गवळी, गंगाधर‎गवळी, सुभाष तायडे, गणेश तायडे,‎किशोर तायडे, कारभारी तायडे,‎बाबासाहेब काळे, दिगंबर केरे‎यांच्यासह गाजरमळा परिसरातील‎शेतकरी उपस्थित होते. अधिकारी‎बंगाळे यांनी शेतकऱ्यांच्या भावना‎जिल्हाधिकाऱ्यांमार्फत‎मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या जातील‎आणि वरिष्ठ स्तरावर जो निर्णय‎होईल, तो जाहीर केला जाईल, असे‎सांगत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *