![]()
भाजप सांगतो म्हणून काही देशातील विरोधी पक्ष संपणार नाही. काही दिवसांनी लोकं सत्ताधाऱ्यांच्या मागे चपला घेऊन धावतील. त्यावेळी यांनाच वाटेल की जमीनीने आपल्याला सामावून घ्यावे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर इंडिआ आघाडीच्या बैठकीला सर्वच पक्षाचे नेते हजर राहणार आहेत, काही जण ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद बरखास्त करा असे सुधीर मुनगंटीवार यांना का वाटत आहे? या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेतली पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांना असे वाटण्याचे कारण आहे, यामध्ये जो यांनी घोडेबाजार सुरू केला आहे. एका दिवसात ज्यांनी 150 कोटी रुपये खर्च केले त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. या पैशाच्या माध्यमातून विधान परिषद, राज्यसभेच्या निवडणुका तुम्ही लढवत आहात म्हणून लोकांना निवडणूक नको आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणूक करा आणि मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी मुनगंटीवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे लावून धरली पाहिजे. पोलिसांवर गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी संजय राऊत म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे जंतर-मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. सरकारला त्यांची दखल घ्यावी लागेल. हे आंदोलन होऊ नये, युवकांनी तिथे पोहचू नये यासाठी सरकार दबावाचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दिपके यांचे आंदोलन हे अराजकीय आंदोलनाचा भाग आहे. सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत आंदोलनासाठी एकत्र येत आहे. आमचेही ते मत आहे. ..हे कॉकरोच जनता पार्टीचे यश संजय राऊत म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी जर हजारो तरुण एकत्र आले तर हे त्यांचे यशच म्हणावे लागेल. हजारो तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नसतील तर त्यांनी पारदर्शक कारभारावर काही बोलू नये. खरंतर अमित शहा यांनी या प्रकरणी राजीनामा द्यायला हवा, कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांचे भविष्य खराब करणारा गुन्हा घडला असेल तर देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे का नाही याचे उत्तर प्रामणिकपणे द्यायला पाहिजे. नीतेश राणे चांगले नेते संजय राऊत म्हणाले की, नीतेश राणे हे चांगले मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या विभागाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांचे कुटुंब बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांतूनच घडले आहे. अनेक पक्षांतर करत त्यांना आता सत्तेत स्थान मिळाले आहे, त्यांनी आपल्या विभागासाठी चांगले काम करावे. सत्यजित तांबेसारखे नेते दिपकेंच्या आंदोलनाला जाणार नाही. जे तरुणांसाठी काम करत आहे, कोणाला घाबरत नाही असे तरुण नेते आंदोलनाला जातील. राज ठाकरे यांच्यासोबत अराजकीय विषयावर चर्चा केली. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे, जो पर्यंत तसे होत नाही तो पर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी भूमिका काल राज ठाकरेंनी मांडली हे मी काल उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो.
Source link
भाजप सांगतो म्हणून देशातील विरोधी पक्ष संपणार नाही:नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे- संजय राऊत