Headlines

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 275 रक्तदात्यांचे अभिवादन:यश खोडके मित्र परिवार व कर्नलसिंह राहल मित्र परिवाराचे आयोजन‎




दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत आज, सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तब्बल २७५ रक्तदात्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवून अजीत पवार यांना अभिवादन केले. अंबापेठ स्थित मृगेंद्र मठ येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यश खोडके मित्र परिवार व कर्नलसिंह राहल मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील युवक, महिला तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. त्यामुळे या परिसरात रक्तदात्यांचा अक्षरशः कुंभमेळाच भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सर्व रक्तदात्यांना आमदार संजय खोडके व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करताना सांगितले की, रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे. आपल्या एका रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन खोडके यांनी केले. कार्यक्रमाला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, अजय दातेराव, पिट्टू शर्मा, कर्नलसिंह राहल, मनीष चौबे, मनोज केवले, अजय कोळपकर, राजाभाऊ चौधरी आदीसह काही मान्यवर व रक्तदाते प्रामुख्याने उपस्थित होते. हेल्मेटची भेट दिली वाहतूक सुरक्षेच्यादृष्टीने अमरावतीत वाहनधारकांना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या शिबिरामध्ये रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. “रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान’ असल्याने अमरावती शहराच्या रक्तदान चळवळीलाही वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *