- Marathi News
- National
- Manipur: Security Forces Barred From Villages Without Prior Warning, Tension Rises After Naga Village Attack
इंफाळ6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

मणिपूरमध्ये जातीय हिंसेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही शांतता अजून दूरच आहे. ताज्या घटनेत सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यातील पोंगरिंगलॉन्ग रोंग्मेई नगा गावात कुकी उग्रवादी संघटना केएनएफ-पीने गोळीबार केला. या घटनेनंतर बेपत्ता झालेले चुन्जांग्लुंग पान्मेई ( वय ५७) नावाच्या नगा व्हिलेज गार्डचा मृतदेह जंगलात आढळला. त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती.
नगा संघटनांचा असा आरोप आहे की केंद्र सरकार कुकी गटांचा वापर छुप्या युद्धासाठी करत आहे. नगा संघटनांनी सुरक्षा दलांवर पक्षपाताचा आरोप केला.निष्पक्ष चौकशीची मागणी केली.चिंग मामांग गावात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. यादरम्यान, नोने जिल्ह्यातील लोंग्जांग/ठंगाल गावाच्या व्हिलेज ऑथॉरिटीने राज्य पोलीस, आसाम रायफल्स, सीआरपीएफ यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार पूर्वकल्पना दिल्याशिवाय त्यांनी गावांमध्ये येऊ नये. ड्रोन देखील उडवू नयेत. मणिपूर हिल एरियाज व्हिलेज ऑथॉरिटी ॲक्ट, १९५६ अंतर्गत गावांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी व्हिलेज ऑथॉरिटीकडे आहे.
मदत छावण्यांत मानवी संकट: तीन वर्षांत ७३१ मृत्यू
मणिपूरमधील सततचा हिंसाचार व तणावामुळे मोठ्या संख्येने लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीतून समोर आले की, तीन वर्षांत ७३१ विस्थापित लोकांना जीव गमवावा लागला. चुराचांदपूरमध्ये २४८, बिश्नुपूरमध्ये १५१, कांगपोकपीमध्ये १२८ मृत्यूची नोंद झाली. राज्याच्या ९ जिल्ह्यांत ४३,६७६ विस्थापित आहेत.
एनआरसी लागू करावा, महिलांची महारॅली
इम्फालमध्ये मंगळवारी १४ नागरी संघटनांच्या महिलांनी ५ किमीपर्यंत महारॅली काढली. एनआरसी लागू करणे, घुसखोरांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या.
रायफल्स, सीआरपीएफ यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार पूर्वकल्पना दिल्याशिवाय त्यांनी गावांमध्ये येऊ नये. ड्रोन देखील उडवू नयेत. मणिपूर हिल एरियाज व्हिलेज ऑथॉरिटी ॲक्ट, १९५६ अंतर्गत गावांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी व्हिलेज ऑथॉरिटीकडे आहे.