![]()
सिल्लोड तालुक्यातील जळकी (वसई) गावात भीषण पाणीटंचामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खर
.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात २,१५,६५६ रूपये खर्च करून पाइपलाइन व नवीन विद्युत बोअरची उभारणी करण्यात आली, तर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अमृत सरोवर योजनेअंतर्गत ४,४१,९६५ रुपये करण्यात आले. एकूण ६,५७,६२१ रुपयांहून अधिक निधी खर्च होऊनही गावातील पाणीप्रश्न मिटलेला नाही.
परिणामी गावातील महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून शेतीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांनी प्रशासन, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांनी तत्काळ दखल घेऊन जळकी (वसई) गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच खर्च झालेल्या निधीची चौकशी करून प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचला का, याचाही आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
घरात लहान मुले आहेत, वृद्ध माणसे आहेत. पण दिवसातील अनेक तास फक्त पाणी आणण्यात जातात. शासनाने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, पण आमच्या घरात पाणी कधी येणार याचे उत्तर कुणाकडेच नाही, असे गावातील सुमनबाई पारखे यांनी सांगितले.
योजनेची चौकशी करण्याची ग्रामस्थांंकडून मागणी ग्रामस्थांचा सवाल आहे की, लाखो रुपये खर्च झाले, योजना राबवण्यात आल्या, नवीन विद्युत बोअर घेण्यात आला, पाइपलाइन टाकण्यात आली, अमृत सरोवर उभारण्यात आले. मग गाव आजही तहानलेले का? खर्च झालेल्या निधीचा नेमका किती फायदा झाला, पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे का राबवल्या गेल्या नाहीत आणि नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष का करावा लागत आहे याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पं. स. कार्यालयाला प्रस्तावच दाखल नाही Ãजळकी वसई गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला प्रस्तावच दाखल झालेला नाही. त्यामुळे टँकर चालू करता येत नाही. प्रस्ताव आल्यावर टँकर सुरू करण्यात येईल. – आशिष म्हस्के , सहायक गटविकास अधिकारी, सिल्लोड