Headlines

मुंबईतील जल्लोष रॅलीत तुकाराम मुंढेंचे बॅनर!:"पोलिस काका मला मारू नका..", चिमुकलीच्या बॅनरनेही वेधले सर्वांचे लक्ष




संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘जेन झी’ विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र जनआक्रोश आणि युवाशक्तीच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली असली तरी, एखाद्या जनआंदोलनाच्या रेट्यामुळे थेट केंद्रीय मंत्र्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरली आहे. विद्यार्थी आणि तरुणांच्या या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबईत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या विजयी रॅलीत तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मात्र यात विशेष चर्चा रंगली ती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाने झळकलेल्या बॅनर्सची. रॅलीमध्ये झळकलेले मुंढेंचे हे बॅनर उपस्थितांचे आणि प्रसारमाध्यमांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर अभिजीत दिपके यांचा देखील फोटो लावण्यात आला होता. त्यावर “या दोन्ही वाघांना मानाचा सलाम” असा मजकूर लिहिला होता. तुकाराम मुंढे तरुणांच्या गळ्यातील ताईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अवैध धंदे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अनेक कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि नियमांचे उल्लंघन चव्हाट्यावर आणत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम अत्यंत आक्रमकपणे राबवली जात आहे. त्यांच्या याच धाडसी, धडक आणि पारदर्शक कार्यप्रणालीमुळे ते पुन्हा एकदा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले असून, याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या या विजयी मोर्चात मुंढेंच्या समर्थनाचे फलक अभिमानाने झळकताना दिसत आहेत. “पोलिस काका मला मारू नका.. ” तसेच याच सभेत एका चिमुकलीच्या पोस्टरने देखील सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर असे लिहिले होते, “पोलिस काका मला मारू नका.. मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्त कमी आहे. पण माझी शौकक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागते. 4 थी पास!” याचसोबत या चिमुकलीच्या वडिलांनी देखील एक पोस्टर सोबत आणले होते. त्यावर असे लिहिले होते की, “माझी मुलगी मला बोलली, पप्पा मोर्चामध्ये आपल्याला दिल्ली सारखं मारतील, मी तिला बोललो, नाही मारणार कारण मोर्चाचे नेतृत्व ठाकरे करत आहेत.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *