Headlines

'एका झुरळाने हुकूमशहाला हरवले':जल्लोष सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'खड्डा मंत्री' म्हणत नितीन गडकरींनाही डिवचले




विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबईच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक नाही, पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे, यात आपण सर्वजण जात-पात धर्म विसरून, होय मी देशभक्त आहे, या एकच भावनेने एकत्र आलात. एका झुरळाने हुकूमशाहाला हरवले आहे, असे म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आता तरी देशाचे काम करावे पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला मोदीजी यांना सांगायचे आहे की आता तरी देशाचे काम करावे. तुमचे नेते पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमन घसरत्या रुपायबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणसाठी पुढे आले. आपले खड्डा मंत्री, नाही, रस्ता मंत्री, ते इथेनोलवर बोलत आहेत. मोदींना सांगायचे आहे की लाडक्या धर्मेंद्रला काढताना किती यातना झाल्या, त्यापेक्षा किती तरी जास्त यातना, या मुलांनी जीव दिला, त्यांच्या पालकांना झाल्या असतील. मत चोरता येतात, लोकं चोरता येत नाही उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका गेल्या खड्ड्यात, कारण आता मोदींनी पाहिले आहे की मत चोरता येतात, लोकं चोरता येत नाही. मन चोरता येत नाही. ही मन आता पेटलेली आहेत, ही ठिणगी पेटलेली ठेवणे हे आपले काम आहे. हे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ शेयर करा आणि त्यांना खरे हिंदुत्व शिकवा. कधी कधी शब्दांच्या पेक्षा कृती महत्त्वाची ठरते उद्धव ठाकरे म्हणाले, कधी कधी शब्दांच्या पेक्षा कृती महत्त्वाची ठरते आणि तुम्ही सगळ्यांनी देशातील इतिहाच्या पुस्तकातील एक सुवर्ण पान लिहिले आहे. याची नोंद इतिहासात केल्याशिवाय कोणी राहणार नाही. आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका. या देशाला दाखवून द्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *