Headlines

अकोटमध्ये खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा:काळाबाजार, तुटवड्याच्या भितीने नियमित पुरवठा असतानाही रात्रीपासूनच गर्दी‎




खरीप हंगामासाठी युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रांबाहेर मध्यरात्रीपासूनच रांगा लागत आहेत. सकाळी खतासाठी कुपन घेतल्यानंतर त्यांना खत खरेदी करावे लागत आहे. सातत्याने खताचा पुरवठा होत असतानाही शेतकऱ्यांची गर्दी का होत आहे, यामागील कारणे शेतकरी व कृषी केंद्रांच्या संचालकांनी सांगितली. पाऊस सुरू झाल्यानंतर आणि खताची मागणी वाढल्यानंतर काळाबाजार झाल्यास जादा पैसे मोजावे लागतील, असे काहींचे म्हणणे आहे. काही जण तुटवड्याच्या भीतीमुळे आताच खरेदी करून ठेवत आहेत. काही शेतकरी व कृषी केंद्रांच्या संचालकांच्या मते पाऊस सुरू झाल्यास शेतरस्त्यांची दुरवस्था होईल. खतांची वाहतूक करणे कठीण होणार आहे. ही सर्व कारणे लक्षात घेऊन कृषी विभागासह सर्वच सरकारी यंत्रणांनी खत पुरवठ्याचे नियोजन करावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सध्यातरी सरकारी यंत्रणांच्या बेताल कारभाराचा फटका आम्हाला बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. गत वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे आता यंदाच्या खरीप हंगामात तरी गतवर्षीचे झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने हालचाली सुरू केल्या. यंदा गतवर्षीपेक्षा २१ हजार मेट्रिक टनाने साठा उर्वरित पान ४ अफवांना बळी पडू नये ^आज अकोट तालुक्यासाठी युरियाचा ग्रामीण भागात ३१९ मेट्रिक टन व शहरी भागाकरिता २०२ मेट्रिक टन असा एकूण ५२१ मेट्रिक टन साठा प्राप्त झाला होता. त्याप्रमाणे प्रत्येक कृषी केंद्रावर प्राप्त होणाऱ्या साठानिहाय प्रत्येक शेतकऱ्यास पाच बॅगप्रमाणे युरिया वाटप करण्यात आले. आणखी आरसीएफ कंपनीचा ८१८ मेट्रिक टन युरिया साठा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. – भरत चव्हाण, कृषी अधिकारी, पंचायत समिती, अकोट. अकोटमध्ये कापूस, सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. यंदा जिल्ह्यात सोयाबीन २ लाख २० हजार तर कपाशीचे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन ५७ हजार ७५० क्विंटल तर कपाशीच्या ३ हजार ६२५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. जिल्ह्याकडून आयुक्तलयाकडे १ लाख १६ हजार ३०० मेट्रिक टन नोंदवण्यात आली असून, त्यापैकी १ लाख १४ २०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले. आतापर्यंत सुमारे ३० हजार मेट्रिक टन मिळाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या (क्षेत्र) तुलनेने कमी पुरवठा होत अहे. रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याने सांगितले की त्याच्याकडे १० एकर शेती असून, त्याला केवळ ५ पोतेच मिळाले. त्यामुळे त्याला आणखी पोत्यांसाठी व्यवस्था करावी लागत असल्याचेही ते म्हणाले. कपाशीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता खतही तेवढेच लागते. नियमित पुरवठा होत आहे ^जिल्ह्यात नियमित खतांचा पुरवठा होत आहे. आज जिल्ह्याला २ हजार ५०० मेट्रिक टन प्राप्त झाला. त्यापैकी ८०० मेट्रिक टन खत अकोट येथे पाठवण्यात आले. तसेच आणखी १ हजार १०० मेट्रिक टन लवकरच येणार असून, त्यापैकी ४०० मेट्रिक टन अकोट येथे पुरवठा होईल. त्यामुळे खतासाठी गर्दी करू नये. – डॉ. तुषार जाधव, जिल्हा कृषी विकास अधिकारी, अकोला. क्षेत्राच्या तुलनेने कमी पुरवठा काय म्हणतात अधिकारी?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *