Headlines

Sandip Deshpande Challenged by Jain Muni to Protest in Bhendi Bazaar


मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी

.

‘दोन समाजांमध्ये दरी निर्माण करू नका’

निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे. जैन समाज हा नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारणारा समाज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी न पडता जैन बांधवांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले.

“तुम्ही जर खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असाल, तर हे लक्षात ठेवा की बाळासाहेब ठाकरे यांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमीच प्रेम केले. त्यांनी कधीही या समाजांना त्रास दिला नाही,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.

संदीप देशपांडेंना थेट चॅलेंज

यावेळी निलेश चंद्र मुनी यांनी संदीप देशपांडेंना थेट आव्हान दिले. “जर तुम्हाला खरंच रस्त्यांवरील धार्मिक प्रथा खटकत असतील, तर मुंब्रा, भेंडी बाजार किंवा पायधुनी भागात जा. ईद किंवा नमाजवेळी रस्त्यांवर पांढरे कापड टाकून लोक बसतात, त्यालाही विरोध करा,” असे ते म्हणाले.

तसेच, “मुंब्रामध्ये एका नगरसेविकेने ‘मुंब्रा हिरवा करेन’ असे वक्तव्य केले होते, त्याविरोधातही भूमिका घ्या. फक्त एका समाजाला लक्ष्य करून वातावरण बिघडवू नका,” असा टोला त्यांनी लगावला.

मनसेने घेतला होता आक्रमक पवित्रा

दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील जैन मंदिराजवळील लेनमध्ये पांढऱ्या रंगाचे पट्टे रंगवण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला होता. यावर आक्षेप घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिकेला दुपारी ३ वाजेपर्यंत हे पट्टे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा स्वतः काळा रंग फासण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

या इशाऱ्यानंतर महापालिकेने तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणांवरील पांढरे पट्टे हटवण्यास सुरुवात केली.

वादाची सुरुवात घाटकोपरमधून

हा संपूर्ण वाद घाटकोपरमधील एका सोसायटीतून सुरू झाला होता. युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी पांढऱी पट्टी रंगवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

प्रसाद वेदपाठक यांनी याला सार्वजनिक जागेचा धार्मिक वापर असल्याचे म्हणत विरोध दर्शवला. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि माध्यमांनीही तो उचलून धरला. वाढता विरोध पाहता संबंधित पांढऱ्या पट्ट्यांवर अखेर रंगकाम करण्यात आले.

वाद संपला की नवा रंग चढला?

घाटकोपरमधील पट्टे हटवल्यानंतर हा वाद संपल्याचे वाटत असतानाच आता दादरसह मुंबईतील इतर भागांतील अशाच पट्ट्यांवरून नवे वाद निर्माण होत आहेत. मनसे आणि जैन समाजातील शाब्दिक संघर्षामुळे हा मुद्दा आता केवळ सोसायटीपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला आहे. आगामी काळात या वादाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या वाचा..

मुंबईत ‘पांढऱ्या पट्टीचा’ वाद तापला:मनसेने दिला अल्टिमेटम, BMCची धावपळ, दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवले

मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला (BMC) तातडीने कारवाई करावी लागली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या कृतीवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून सार्वजनिक जागांवर अशा प्रकारे धार्मिक कारणांसाठी बदल करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सविस्तर बातमी वाचा..

जैनांच्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवं वळण:प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर संताप

मुंबईतील घाटकोपर परिसरात जैन समाजासाठी सार्वजनिक ठिकाणी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर आवाज उठवणारे डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि सार्वजनिक जागांचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.