Headlines

Shirdi Sai Trust Income Sees Dip; Asset Donations Rise in FY 2025-26



शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत रोख रकमेसह सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात सढळ हाताने दान अर्पण करून आपली इच्छापूर्ती

.

शिर्डी येथी साईबाबा ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले आहे. असे असले तरी मागच्या आर्थिक वर्षात 15 कोटींचे वस्तुरूपात अतिरिक्त दान प्राप्त झाल्याने दान अधिक असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात येत आहे. तसे पाहता मागच्या आर्थिक वर्षात मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात जवळपास 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सुमारे 10 कोटींची घट

आर्थिक लेखाजोखानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षातील साईबाबा संस्थानचे 648 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न 2025-26 मध्ये 638 कोटी रुपयांवर आले असून, त्यात सुमारे 10 कोटींची घट नोंदवली गेली आहे. मात्र, या रोख उत्पन्नाव्यतिरिक्त संस्थानाला भक्तांकडून 15 कोटी रुपयांचे अतिरिक्त दान वस्तूंच्या स्वरूपातही प्राप्त झाले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले की, वस्तू स्वरूपातील या दानाचा विचार केल्यास, प्रत्यक्षात गतवर्षीच्या तुलनेत यंदा संस्थानाला मिळालेल्या एकूण दानात घट न होता वाढच झाली आहे.

शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविकांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या मौल्यवान वस्तूंच्या, विशेषतः सोने-चांदीच्या स्वरूपातील देणगीत मात्र लक्षणीय वाढ झाली असून, 2024-25 या वर्षात मिळालेल्या 13 कोटी 95 लाख रुपयांच्या दानाच्या तुलनेत यंदाच्या म्हणजेच 2025-26 या वर्षात हा आकडा वाढून थेट 19 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

2024-25 मध्ये 648 कोटी, तर 2025-26 मध्ये 638 कोटी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या उत्पन्नाची आकडेवारी पाहिली असता, सन 2024-25 मधील 648 कोटी रुपयांच्या तुलनेत सन 2025-26 मध्ये एकूण रोख उत्पन्न 638 कोटी रुपयांवर आले आहे. मात्र, याच कालावधीत भाविकांकडून मिळणाऱ्या सोने-चांदीच्या दानात लक्षणीय वाढ झाली असून, 2024-25 मधील 13 कोटी 95 लाख रुपयांवरून हे दान 2025-26 मध्ये थेट 19 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ज्यामध्ये सुमारे 16 किलो सोने आणि 197 किलो चांदीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, संस्थानच्या हॉस्पिटल आणि इतर इमारतींच्या कामासाठी भक्तांकडून 15 कोटी रुपयांचे अतिरिक्त दान वस्तूंच्या स्वरूपातही देण्यात आले आहे.

दरम्यान, साईबाबा संस्थानची एकूण संपत्ती आणि जमा ठेवींचे आकडेही थक्क करणारे आहेत. सध्या संस्थानकडे तब्बल 3,603 कोटी रुपयांच्या एकूण ठेवी जमा आहेत. तसेच, आजवर देश-विदेशातील भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान दानातून संस्थानच्या तिजोरीत आतापर्यंत एकूण 550 किलो सोने आणि तब्बल 7,030 किलो चांदी जमा झाली आहे. ही आकडेवारी भाविकांची साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि त्यांनी सढळ हाताने केलेल्या दानाची प्रचिती देते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *