Headlines

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा शुभारंभ:आता केवळ शिंदेंच्याच नेतृत्वात एकमेव शिवसेना- अमित शहा




काही काळापूर्वी आम्ही शिवसेना शिंदे गट असे म्हणत होतो, पण आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात एकमेव शिवसेना आहे, असे केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले. शनिवारी शाह व त्यांच्या पत्नी सोनल यांच्या हस्ते कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. कोल्हापूर ही सहकाराची आद्यपंढरी- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील ५ जोतिर्लिंगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास सुरू आहे. कोल्हापूर केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्यपंढरी आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मंदिर परिसराच्या विकासानंतर कोल्हापूर वेगळ्या उंचीवर जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *