Headlines

चांदवडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा:नगराध्यक्ष वैभव बागूल यांचे नागरिकांना आवाहन‎




यंदा जून महिन्याचा मध्य उलटून गेला तरी मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नाही. तालुक्यात व चांदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर, नागरिक व शेतकरी बांधवांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्ष वैभव बागूल यांनी केले आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, घरगुती वापरात दैनंदिन कामांमध्ये पाण्याचा किमान आणि आवश्यक तितकाच वापर करावा, घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नये, पाणी भरल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करावा, वाहने धुणे अथवा इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन वैभव बागूल यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *