![]()
शहरातील बाजारपेठेत सध्या लोणच्याचीकैरी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबडउडाली आहे. वर्षभर हे लोणचे नागरिकांच्यातोंडाला चव देत असते, त्यामुळे जूनमध्येलोणच्याची कैरी फोडून ती खरेदीकरण्यासाठी गृहिणी व नागरिक बाजारपेठेतयेत असतात. सध्या फोडलेली लोणच्याचीकैरी दर्जानुसार ६० ते ८० रुपये किलो दरानेमिळत आहे. तर त्या यंदा १० ऐवजी १५ रुपयेकिलोने फाेडून मिळत आहे. घाट, छत्रपतीसंभाजीनगर व जिल्ह्यातील काही भागातूनमोठ्या आकाराच्या व पांढरा गर असलेल्याकैऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. कडक, पांढऱ्या गराच्या कैरींना पसंती
लोणचे वर्षभर टिकावे, त्याची चव आंबट असावीयासाठी गावरानी, कडक आणि आतून गर असलेल्याकैरीला मागणी आहे. दर्जानुसार भाव ६० ते ८० रुपये आहे.दररोज शहरात दररोज २० टन कैरीची आवक होत आहे.
– रामेश्वर माळी, विक्रेते. कोलेस्टेराॅल आणि उच्च रक्तदाब वाढताे
^लाेणच्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे.लोणचे टिकवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वतेलाचा तर चव आणण्यासाठी मसाल्यांचा वापर केलाजातो. यामुळे कोलेस्टेराॅल वाढू शकते. उच्च रक्तदाब,अॅसिडीटीचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनीएकतर लोणचे जपून सेवन करावे किंवा ते खाणे टाळावे.
– डॉ. सुमीत पाटील, फिजिशियन कामाची गोष्ट: बाजारात कैरी फोडताना हे करा
बाजारपेठेत कैरी फोडून मिळण्याची सोयअसल्याने घरी कैरी फोडण्याची पद्धतआता कालबाह्य झाली आहे. मात्र,बाजारात उघड्यावर ठेवलेली कैरीअस्वच्छ असण्याची शक्यता जास्तअसते. जर ती तशीच फोडली, तरलोणचे खराब होऊ शकते. यासाठी कैरीआधी स्वच्छ पाण्यात नीट धुऊन घ्या.त्यानंतर कैरी काही वेळ सुकण्यासाठीठेवून स्वच्छ कापडाने कोरडी पुसावी.त्यानंतर ती फाेडावी. ज्यामुळे लोणच्याचीशुद्धता आणि गुणवत्ता वर्षभर राहते.
Source link
लोणच्यासाठी दररोज तब्बल 20 टन कैरीची जळगावात आवक:10 ऐवजी 15 रुपये किलो कैरी फोडण्याचे दर, 60 रुपये किलोने विक्री