विशाखापट्टणम येथे होती. २० जूनच्या मध्यरात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत त्यांची टॉवरवर ड्युटी होती. याच दरम्यान कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी दुपारी सैन्य दल आणि डीएससीच्या जवानांनी त्यांचे पार्थिव अमरावतीत आणले. साईनगर परिसरातील महर्षी अपार्टमेंट येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. जवान पराग मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी मयुरी, आठ वर्षांचा मुलगा संभव आणि चार वर्षांची मुलगी ओमिषी, भाऊ असा परिवार आहे. हवेत फैरी झाडून दिली मानवंदना जवान पराग मोरे यांचे पार्थिव हिंदू स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी तसेच शहर पोलिस दलाने त्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी बडनेराचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलिस जवानांनी हवेत फैरी झाडून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली. या प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. फेरीत विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणी आटोपताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सदर तपशील भारत निवडणूक आयोगाला कळवला. त्यानंतर साधारणत: तासाभराने प्रवीण पोटे यांच्या विजयाची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह.पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, सहायक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार व प्रसेनजित चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे आदी अधिकारी उपस्थित होते. पक्षीय बलाबल लक्षात घेता भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार आहेत. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३, युवा स्वाभिमानचे २६, प्रहारचे २१, शिंदेसेनेचे १८ आणि बसपचे ३ मिळून महायुतीची संख्या २५१ आहे. प्रवीण पोटे यांनी तब्बल ३९० मते प्राप्त केल्यामुळे त्यांनी महायुतीवगळता इतर पक्षांची १४० मते आपल्या पारड्यात खेचली आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील नगरसेवकांच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे १२०, उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ मिळून मविआचा आकडा १५२ वर थांबला आहे. मात्र मविआचे उमेदवार काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांना यापैकी एकानेही मतदान केले नाही. याशिवाय एमआयएम (१६), सपा (२) आणि २५ अपक्ष अशी दोन्ही प्रवाहांपासून दूर असलेल्यांची संख्या ४३ आहे. यापैकी बहुतेक नगरसेवकांनीही महायुतीच्या उमेदवारालाच कौल दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पुरेपूर झाला. निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच आणि मतदानाला अवघे आठ-दहा दिवस शिल्लक असताना काँग्रेसचे उमेदवार थेट आयसीयूमध्ये दाखल झाले. त्याचवेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री आणि या निवडणुकीसाठी नियुक्त पक्ष निरीक्षक ॲड. यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांच्याबाबत आर्थीकबाबतीत गंभीर स्वरूपाची चर्चा असल्याचा जाहीर आरोप केला. भाजपच्या विजयाचा अंदाज जरी अनेकांना होता, तरी काँग्रेसचा ३९० विरुध्द ० अशा फरकाने अक्षरशः सुपडासाफ पराभव होईल, अशी शक्यता फार कमी लोकांनी वर्तवली होती. राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या अभ्यासकांना कदाचित याची चाहूल लागली असेल; मात्र सर्वसामान्य मतदारांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे.
Source link
कर्तव्य बजावताना जवान मोरे यांना वीरमरण…:अमरावतीत शासकीय इतमामात पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार