Headlines

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळा पण वाचनासह अभ्यासाकडेही लक्ष द्या:नांदखुर्दे खुर्द जि.प. शाळेत तहसीलदार गोपाल पाटील यांचे मार्गदर्शन‎




शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ अवश्य खेळावेत. पण त्याचवेळी अभ्यासापुरताच मोबाईलचा वापर करून अवांतर वाचनाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे प्रतिपादन एरंडोलचे तहसीलदार गोपाल पाटील यांनी केले. एरंडोल तालुक्यातील नांदखुर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ‘शाळापूर्व तयारी अभियानाच्या’ दुसऱ्या मेळाव्याप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्यानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक स्टॉल्स लावण्यात आले होते. तहसीलदार गोपाल पाटील यांनी या स्टॉल्सची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शालेय विद्यार्थी आणि तहसीलदार यांच्यातील हा अनोखा व जिव्हाळ्याचा वार्तालाप ग्रामस्थ आणि पालकांनी प्रथमच जिल्हा परिषद शाळेत अनुभवला. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राजेंद्र मोरे, माजी सभापती गबाजी पाटील, कैलास पवार, सुनील पाटील, उषा पाटील आदी मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सीमा पाटील, रूपाली पाटील, शिक्षक प्रेमचंद अहिरराव, धनराज भामरे आणि तरुण मंडळाने परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *