![]()
लासूर स्टेशन ते वैजापूर जाणाऱ्या लासूरगाव जवळील शिवना नदीवरील पुलाची झालेली जर्जर अवस्था, तुटलेले संरक्षण कठडे, खड्डेमय रस्ता असताना दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भानवाडी येथील टोल वसुलीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच संबंधित विभागाकडे पत्रकाद्वारे केली आहे. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-१ (आय) वरील लासूरगाव लासूर स्टेशनजवळील शिवना नदी पुलाची जर्जर अवस्था झालेली असून तुटलेले संरक्षण कठडे, खड्डेमय रस्ता तसेच दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भानवाडी येथील टोल वसुलीबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत आमदार बंब यांनी मागणी केली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे एखादे वाहन नियंत्रणाबाहेर गेल्यास पुलाखाली जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पुलाजवळ असलेला टोल वसुली मागील २०-२५ वर्षांपासून सुरू आहे. नागरिकांनी दीर्घकाळापासून टोल कर भरला असूनही पूल व रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पुखड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात यावी. तुटलेल्या संरक्षण कठड्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी. तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही आमदार प्रशांत बंब यांनी दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
Source link
लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे तुटले:ठिकठिकाणी खड्डे, भानवाडी येथील टोलवसुली बंद करा, आमदार प्रशांत बंब यांची मागणी