Headlines

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎



शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स

.

सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील अनेक भजन मंडळे, कीर्तनकार आणि स्वामीभक्त या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार असल्याने सप्ताहाला विशेष रंगत प्राप्त झाली आहे. येत्या गुरुवारी, २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे करमाळा शहरात भव्य आगमन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

पालखी आगमनानंतर रात्री ८ वाजता महाआरती संपन्न होणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे साडेचार हजारांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक उत्सवामुळे करमाळा शहरासह परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, अखंड हरिनाम सप्ताह, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा पालखी सोहळा यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या जवळपास तीन दशकांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे हजारो भाविकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळत असून, करमाळ्यात स्वामीभक्तीची परंपरा अधिक दृढ होत आहे. यंदाही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान स्वामी समर्थ मंदिर फंड गल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये प्रवचने, कीर्तने, भजने, हरिपाठ तसेच पारायण यांचा समावेश आहे. दररोज सकाळी पारायण व प्रवचन, तर रात्री हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *