Headlines

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी




राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आकडेवारी समोर ठेवत सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव उघड होत असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बँकेतून कर्ज घेतलेल्या 23 हजार 920 शेतकऱ्यांचे जून 2025 अखेरपर्यंत सुमारे 370 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. फक्त 30 टक्के शेतकरी पात्र सरकारने घातलेल्या अटी-शर्तींमुळे या थकीत कर्जदारांपैकी केवळ 7 हजार 566 शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत. या शेतकऱ्यांचे सुमारे 128 कोटी रुपयांचे पीककर्ज माफ होणार आहे. म्हणजेच एकूण थकबाकीदारांपैकी फक्त 30 टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 70 टक्के शेतकरी लाभापासून वंचित उर्वरित तब्बल 70 टक्के शेतकरी सरकारच्या जाचक निकषांमध्ये अडकून कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे सरकारची ही योजना सर्वसमावेशक नसून निवडक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीयकृत बँकांतील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांची ही अवस्था असताना राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. या शेतकऱ्यांचा विचारच केला जात नसल्याचे सांगत सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवली. विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट आणि सरसकट कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील आणि सरकारला वास्तव परिस्थिती दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह कर्जमाफीच्या घोषणांचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या पाहता सरकारचे दावे आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अटी-शर्ती शिथिल करून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे मर्डर- केतनला टेकडीच्या कडेला बसलेले पाहिले:सियाला तेव्हाच त्याला खाली ढकलण्याची कल्पना सुचली; यातून वाचल्यास रस्ते अपघाताचा प्लॅन B तयार होता पुणे प्रियकर खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, 31 मे रोजी सिया आणि तिचा प्रियकर केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे केतन एका धोकादायक ठिकाणी बसला होता. तेव्हा सियाला त्याला मारण्याची कल्पना सुचली. तपासात हे देखील समोर आले आहे की, 14 जून रोजीही केतनला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सियाने साप दिसल्याचे नाटक करून घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण केतन वाचला होता. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *