![]()
वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील लोणी खुर्द परिसरातील तलवाडा, वाकला, पाराळा, भादली, टुनकी, अंचलगाव, नायगव्हाण, चिकटगाव, खरज, निमगाव या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. मोठा पाऊस नसला तरी सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतीकामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी मका, कपाशी, अद्रक, मूग, भुईमूग आणि सोयाबीनच्या लागवडीला सुरुवात केली आहे. काही शेतकरी मजुरांच्या टंचाईमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने मका पेरणी करत आहेत. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने आपल्या सर्जा-राजाच्या साथीने पेरणीला प्राधान्य देत आहेत. दरम्यान, काही सावध शेतकरी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण आहे. निसर्गाचा लहरीपणा, गुलाबी बोंडअळी, पडलेले भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यंदा भरघोस उत्पादनाचे स्वप्न पाहत आहे. सध्या पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र गतवर्षीसारखा हा पाऊस शेवटपर्यंत साथ देईल का, अशी चिंता लागली आहे. यावर्षी परप्रांतीय मजूर आलेले नाहीत. स्थानिक पातळीवरही मजूर मिळत नसल्याने शेतीकामे उरकताना कसरत होत आहे. पाऊस चांगला झाला तरच पुढील कामे शक्य होतील, असे तलवाड्याचे शेतकरी दीपक गायकवाड यांनी सांगितले. खतांच्या किमतीत वाढ मागील वर्षाच्या तुलनेत खतांच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली असून, खते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. आम्ही सर्व खातेदारांना बियाणे व खते देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शेतकरी विशिष्ट ब्रँडसाठीच आग्रह धरतात, त्यामुळे काहीवेळा आम्हाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे लोणी खुर्द येथील गणेश अॅग्रोच्या संजय जाधव यांनी सांगितले. आता पेरणी केल्यास बियाणे होरपळून जाण्याचा धोका Ãवैजापूर तालुक्यातील शिऊर मंडळात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. सध्या केवळ १० ते १२ मिमी पाऊस झाला असून जमिनीत उष्णता आहे. अशात पेरणी केल्यास बियाणे होरपळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. -डी. व्ही. पुंड, कृषी पर्यवेक्षक
Source link
लोणी खुर्द परिसरात पेरणीची लगबग:100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका