![]()
महिला सक्षमीकरण बाबतीत शासन निवेदनशील असल्याचे सांगून लासूरगावातील प्रत्येक घरातील महिलांनी बचतगटात सहभागी होऊन वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू करावे. या रोजगाराच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी बनण्याचा निर्धार करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले आहे. लासूरगाव ता. वैजापुर येथे बुधवारी गावाकडे चला अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत घरकुल योजना महिला बचत गट व एकल महिला लाभार्थी मेळाव्याचे आयोजन श्री देवी दाक्षायाणी मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके बोलत होते. या प्रसंगी गटविकास अधिकारी ज्ञानदेव जायभाय, विस्तार अधिकारी रंजना राठोड, शाखा अभियंता उढान, जिल्हा परिषद सदस्य संगीता सुभाष तांबे, पंचायत समिती सदस्य अर्चना आप्पासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य राहुल पाटील शेळके, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहींज, उपसरपंच रितेश मुनोत, वसंतराव हुमे, रंजित देशमुख, मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, राजेंद्र संगेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
प्रत्येक महिलेने बचत गटात सहभागी होऊन स्वावलंबी बनावे- वासुदेव सोळंके:लासूरगावातील घरकुल महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद