Headlines

माळशिरस तालुक्यात पाण्याअभावी पिके लागली जळू, शेतकरी चिंतेत:हाल खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; ऐन पावसाळ्यात 10 गावात पाण्याचे टँकर सुरू‎



गतवर्षी मे मध्येच वार्षिक सरासरीपेक्षा जादा पाऊस झालेल्या माळशिरस तालुक्यात यावर्षी खरिपाच्या पेरण्या तर अजून नाहीतच शिवाय वीज व पाण्याअभावी आहे ती पिके जळून चालली आहेत. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १० गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत.

.

गतवर्षी १२ मे रोजीच मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले होते. दि. २९ मे पर्यंत जिल्ह्याची सरासरी २५.१ असताना २२३ मिमी पाऊस होऊन सरासरीच्या ८८८.४ टक्के झाली होती. माळशिरस तालुक्याची मे ची सरासरी १६.३ असताना २८९.९ म्हणजे सरासरीच्या १७७८.५ टक्के इतका पाऊस झाला होता. गत वर्षी एवढा मोठा पाऊस झाला तरी भिज पाऊस नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही, ते वाहून गेले.

यावर्षी जून संपला व पावसाळ्यातील रोहिणी व मृग नक्षत्र संपून आर्द्रा निघाले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही, तर अल निनोच्या नावाखाली शासनाने पिण्यासाठी राखीव पाण्याच्या नियोजनाच्या नावाखाली धरणे, तलावातून पाणी सोडणे बंद केले आहे. जेथे पाणी उपलब्ध आहे त्याठिकाणी राज्य वीज वितरण कंपनीने ४ ते ६ तासांचा वीज पुरवठा सुरू ठेवला आहे.

यावर्षी तालुक्यात तापमान ही ४२ अंशांपर्यंत गेल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन विहिरी, शेततळ्यातील पाण्याने तळ गाठला आहे. तर ३०० फूट खोलीपर्यंतची बोअर पूर्ण आटली असून काही ठिकाणी गुळण्या मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली पिके ^सध्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार २५ अंपियर पर्यंतचा दाब असलेल्या ठिकाणी नवीन भार नियमना नुसार ६ तास तर दाब वाढल्यास ४ तासांचा शेती विद्युत पुरवठा सुरू आहे. रात्री शेतीचा पुरवठा बंद करून सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र पाऊस आल्यास यामध्ये तातडीने बदल होऊन शेतकऱ्यांना पुरेसा विद्युत पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – प्रसाद कोहळे, कार्यकारी अभियंता, अकलूज ^गेल्यावर्षी या दिवसात चांगला पाऊस झाल्याने पेरण्याची लगबग सुरू होती. मात्र यावर्षी दोन नक्षत्रे गेली तरी कसलाही पाऊस नसल्याने खरीप पेरण्या तर खोळंबल्या आहेतच पण अपुरा वीजपुरवठा व पाण्याअभावी आहे ती पिकेही जळून चालली आहेत. यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. – चंद्रकांत कुंभार, शेतकरी, यशवंतनगर पिके मात्र जाळून चालली असल्याचे विदारक सत्य माळशिरस तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली असून सध्या सुळेवाडी, पळस मंडळ, पिंपरी, कदमवाडी, गारवाड, मगरवाडी, पठाण वस्ती, जळभावी, कोथळे व उंबरे दहीगाव याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू असून अजून दोन ठिकाणची मागणी आली आहे. जळभावी येथील कोळेकर वस्ती, सुळ वस्ती, हिरवे वस्ती, शिंदे वस्ती, सरगर वस्ती, देशमुख वस्ती या सहा वस्त्यावर १२ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या चार खेपा दररोज करण्यात येत आहेत.

खरीप हंगाम वाया जाण्याची भीती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *