![]()
“महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणाला राज्यातील जनता आता पूर्णपणे वैतागली असून लोकांमध्ये या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड राग आहे. जर कुणाला पक्ष सोडायचाच असेल, तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मगच दुसऱ्या पक्षात गेले पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरांवर हल्ला चढवला आहे. सध्या देशात लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असली, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या संकटातून पुन्हा एकदा जोमाने उभारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फोडाफोडीच्या राजकारणावर टीका विजय वड्डेटीवार म्हणाले, राज्यातील जनतेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात प्रचंड नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मतांचा आदर ठेवत पक्षांतर करायचे असल्यास प्रथम आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेचा कौल घ्यावा. ‘लोकशाही धोक्यात’ राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत वड्डेटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अशा प्रकारच्या राजकारणामुळे जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील शिवसेनेतील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास वड्डेटीवार यांनी व्यक्त केला. ठाकरे-फडणवीस विमानप्रवासावर प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच विमानाने झालेल्या प्रवासावर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना वडेट्टीवार यांनी पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “हा प्रवास केवळ एक योगायोग होता. उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा पूर्वनियोजित होता, तर देवेंद्र फडणवीस हे दर शनिवार-रविवारी त्यांच्या नागपूर या मतदारसंघात येत असतात. त्यामुळे दोघे एकाच विमानात समोरासमोर आले, यामागे कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.” भाजपला आता ठाकरेंची गरज नाही
महाविकास आघाडीत किंवा राजकीय समीकरणात बदल होणार का, यावर बोलताना वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत भाजपला उद्धव ठाकरेंची अजिबात गरज नाही. त्यामुळे या विमान प्रवासावरून युती किंवा नव्या आघाडीचे कयास लावणे निरर्थक आहे. ६ खासदारांच्या पक्षांतरानंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जनता उभी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दाखवला. हे ही वाचा.. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे लक्ष ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या विदर्भ दौऱ्याची पहिली जाहीर सभा आज सकाळी १० वाजता यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा
Source link
फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात:जनता वैतागली, ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल- विजय वडेट्टीवार