Headlines

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎



पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या यात मेळाव्यात कौटुंबिक समस्या न

.

मेळाव्यात अध्यक्षस्थानी उमरीचे माजी सरपंच तथा ओम साई बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम कपले होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, सचिव प्रदीप खाडे, पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बहाकार, सचिव अॅड. दीपाली जानोरकर, सहसचिव संगीता दाळू, प्रा. राजेंद्र भुयार उपस्थित होते. संत श्री गजानन महाराजांचे पूजन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविक करून मेळावा आयोजनाचा हेतू विशद केला. महिला मंडळाच्या पुढाकारामधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमास माधुरी कपले, उषा टिकार प. स. सदस्या, ज्योती मानकर, डॉ. सुरेश गावंडे, राधा राऊत, संध्या दांदळे, अनुसया गोंडचवर,अण्णा टाले,अशोक गावंडे, गजानन महल्ले, भोलेनाथ नळेकर, रमेश कोकाटे, अरुण बोन्द्रे, रोहिणी भारंबे, दीपाली बढे, वैशाली लाहे, निर्मला मोकाशे, नलिनी गावंडे, राधा मिरगे, जयश्री हातोलकर, मंगला थोरात, वर्षा शेलार, मीनल अलमाबादे, सुनंदा पवार, संगीता जंगले, रूपाली बिहाडे, मंदा वैद्य, ज्योती काकड यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदीप खाडे यांनी मानले.

कोर्टाची पायरी चढणे टाळा बळीराम कपले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात घरात उद्भवणाऱ्या समस्यांवर कुटुंबातील सदस्यांनी समजूतदारपणा घेऊन घराच्या चौकटीतच तोडगा काढावा, त्यास सार्वजनिक स्वरूप देऊन कोर्टाची पायरी चढणे टाळावे असे आवाहन केले.अॅड. दीपाली जानोरकर यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात कौटुंबिक समस्या समेट केंद्रामार्फत समस्या कशा निवारण करण्यात येतील यासह महिलांसाठी असलेल्या विविध कायद्या बाबत मार्गदर्शन करून या समेट केंद्राचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. वैशाली बहाकार यांनी महिलांनी जास्तीत जास्त संख्येत पाटील समाज महिला मंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले. महिलांसाठी असणारे उपयुक्त कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. राजेंद्र भुयार यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *