Headlines

मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला:शहरात सायंकाळी दीड तास पाऊस बरसला‎




अकोला शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. जोराच्या पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. पावसामुळे अकोला शहरातील वीज काही काळ गेली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. अकोला शहरात सायंकाळी पाचपासून साडेसहा वाजेपर्यंत सुमारे दीड तास पाऊस बरसला. त्यानंतर त्याने थोडी विश्रांती घेतली. परंतु जोरदार पावसामुळे अकोला शहरातील वीजपुरवठा बराच काळ थंडीत झाला होता. मूर्तिजापूर येथेही पावसाला सुरूवात झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *