Headlines

सलग सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी:अन्नछत्र मंडळात घेतला महाप्रसाद;‎ तासाभरात सहा हजार भाविकांचे दर्शन‎



अक्कलकोट श्रावण मास सुरुवात होऊन सलग शनिवार रविवार, सलग सुट्यामुळे शनिवारी पहाटेपासून वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे ५० हजारपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्य

.

सेल्फीची क्रेझ वटवृक्ष मंदिरातील ऐतिसाहिक वटवृक्ष, रुद्राक्ष स्वामी चित्र, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ प्रांगणातील अजानबाहू स्वामीची मूर्ती, स्वामी वाटिका, शिवसृष्टी, गणेश मंदिर, तुळजाई मंदिर, समाधी मठ, चोळप्पा महाराज यांचे घर, विहीर, पादुका, स्वामीच्या वापरलेल्या वस्तू या ठिकाणी फोटो घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

स्वामी भाविकांनी समाधान व्यक्त केले

भाविकांची संख्या वाढली. भाविक धार्मिक पर्यटनांचा कुटुंबीयांसह लाभ घेतला. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविकांनी अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसादाची सेवा केली जात होती. मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करून चारचाकी वाहन पार्किंगमध्ये सोडले जात होते. अक्कलकोट मुक्कामी राहून भाविक तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर आदी धार्मिक स्थळांना भेट देऊन कुटुंबीयांसह धार्मिक पर्यटन करताना दिसत होते.पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र रांग होती. पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती, असे वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *