Headlines

यंंदा वह्यांच्या किंमतीमध्ये 10% वाढ:शाळांमधून पुस्तके मिळत असल्याने नवीन पुस्तकांचा व्यवसाय ठप्प‎




जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री यांसारख्या शालेय साहित्याने बाजारपेठ पूर्णपणे फुलली आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने अकोला शहरातील टिळक रोड, महात्मा गांधी चौक आणि चिवचिव बाजार परिसरात खरेदीसाठी पालकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. आपल्या लाडक्या दोस्तांना पुन्हा भेटण्याच्या आणि नवीन साहित्यासह शाळेत जाण्याच्या उत्सुकतेपोटी मुलांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यावर्षी पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे कागदाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून छपाईचा खर्च वाढल्याने पाठ्यपुस्तके व वह्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के दरवाढ झाली, असे शहरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वी ५०० ते ५२० रुपये डझनाने मिळणाऱ्या वह्या आता थेट ६०० रुपयांवर गेल्या आहेत. मात्र, शाळांच्या बॅग व दप्तरांच्या किमती गतवर्षी-इतक्याच स्थिर आहेत. एकीकडे बाजारात गर्दी दिसत आहे. ^केजीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २५० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतची दप्तरे आमच्याकडे उपलब्ध आहेत. शाळा सुरू होण्यास दोन दिवस उरले असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. – जय गलानी, दप्तर, बॅग्ज विक्रेते, अकोला. आमचा ६० % व्यवसाय बुडाला ^शाळांनी स्वतःच पुस्तके विकायला सुरुवात केल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय ५० ते ६० टक्क्यांनी बुडाला आहे. शाळा स्वतःच्या कव्हरच्या वह्या व बाहेरच्या राज्यातील ३५०० हून अधिक प्रकाशकांकडून पुस्तके घेतात, आम्ही इतकी पुस्तके दुकानात ठेवू शकत नाहीत. दरवर्षी व्यवसाय १५ टक्क्यांनी खाली येत असून, आता केवळ ४० टक्के मार्केट उरले आहे. बरेचसे पालक आता केवळ सेकंड हँड पुस्तके शोधण्यासाठी आमच्याकडे येतात. – गौरेश डाबरे, पुस्तक विक्रेते,



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *