Headlines

Skill training and employment have changed the fate of transgenders, the hands of beggars are now taking over the reins of corporate business


  • Marathi News
  • National
  • Skill Training And Employment Have Changed The Fate Of Transgenders, The Hands Of Beggars Are Now Taking Over The Reins Of Corporate Business

डॉ. मनीष जैन, सह-संस्थापक, किनीर गरिमा फाउंडेशन1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक
बँकेत एचआर मॅनेजर एमी चौहान. - Divya Marathi

बँकेत एचआर मॅनेजर एमी चौहान.

  • १२०० हून अधिक ट्रान्सजेंडर्सना मुख्य प्रवाहात जोडणाऱ्या किनीर फाउंडेशनला वर्ल्ड ५० इम्पॅक्ट अवॉर्ड

कानपूरची ४१ वर्षीय एमी चौहान ट्रान्सवुमन आहे. वर्ष २००१ मध्ये अपघातात तिने दोन्ही पाय गमावले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने भीक मागितली. आर्थिक चणचण, वडिलांचे छत्र नसणे व समाजाच्या विचारसरणीने एमीला अनेकवेळा हताश करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये काम केले, परंतु लैंगिक ओळखीमुळे तिला वारंवार भेदभावाचा सामना करावा लागला. ती बेघर झाली. मात्र आज एमी दिल्लीत ॲक्सिस बँकेत एचआर मॅनेजर आहे आणि स्वाभिमानाने जगत आहे. हे शक्य झाले पुणे येथील किनीर गरिमा फाउंडेशनमुळे. २०१८ मध्ये सुरू झालेले हे फाउंडेशन १२०० हून अधिक ट्रान्सजेंडर्सचे आयुष्य बदलून टाकले आहे. संस्थेला वर्ल्ड ५० इम्पॅक्ट अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘डिझाइन फॉर अपॉर्च्युनिटी’ श्रेणीत हायली रिकमेंडेड सन्मान मिळाला.

एमी प्रमाणेच वडोदरा येथील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय आकृती पटेलची कथा देखील आहे. आकृतीच्या लहानपणीच पालकांचा मृत्यू झाला होता. संस्थेकडून मदत मिळाल्यानंतर आज आकृती बिझनेस ॲनलिस्ट आहे. ती पुण्यात २ कॉर्पोरेट्समध्ये ट्रान्स कॅफेही चालवते. तसेच, दार्जिलिंगच्या स्वर थापाला (३३) संस्थेने फ्लिपकार्टमध्ये काम मिळवून दिले. स्वर सांगते, येथूनच तिने स्वाभिमानाने जगणे शिकले. आज ती दिल्लीत प्राइड प्लेट नावाने फूडकार्ट, स्वरात्मा नावाने स्वतःची एनजीओ चालवते, जी ट्रान्सजेंडर्स आणि गरजू लोकांची मदत करते. – जसे ‘दिव्य मराठी’च्या राजेश यांना सांगितले.

प्रशिक्षण व नोकरी मिळवून देतात

किनीर गरिमा फाउंडेशनचे सह-संस्थापक मनीष जैन सांगतात, आम्ही ट्रान्सजेंडर्सना मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण देतो. त्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांसोबत मिळून प्लेसमेंट मिळवून देतो. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे १२०० हून अधिक ट्रान्सजेंडर रिटेल, हॉस्पिटॅलिटी, कॉर्पोरेट सारख्या क्षेत्रात काम करत आहेत. फाउंडेशनशी संबंधित एका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरमध्ये उत्पादनापासून ते पुरवठ्यापर्यंत सर्व कामे ट्रान्सजेंडरच करतात. तसेच, ‘चाय विथ डिग्निटी’ या उपक्रमांतर्गत सामान्य लोक आणि ट्रान्सजेंडर समुदायाचे सदस्य एकत्र बसून चहा पिताना संवाद साधतात. या उपक्रमाचा उद्देश भीती आणि गैरसमज संवादाच्या माध्यमातून दूर करणे हा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *