![]()
सोलापूर | लोकशाहीत प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे, त्यांचे स्वातंत्र्यही भिन्न आहे. पण, प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे असे मत प्रा. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. वसुंधरा महाविद्यालयात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित व्हावी. यासाठी संवैधानिक नैतिकता पाळली पाहिजे. लोकसंख्येनुसार प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यावे, तरच बंधुभाव निर्माण होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निजामुद्दीन शेख होते. त्यांनी संविधानाची आवश्यकता, संविधानाचे काटेकोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल आपले मत मांडले. प्रास्ताविक मनीष सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. किशोर जोगदंड यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.भागवत गजधने यांनी करून दिली. आभार प्रवीण सुकाळे यांनी मानले. तनिष्क वाघमारे, आर्यन कापुरे, मधुर गायकवाड यांनी नियोजन केले होते. प्रा. एम. आर. कांबळे, प्रशांत गायकवाड, दत्ता थोरे, प्रा. डॉ. सुहास उघडे, यशोदीप आठवले यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी | सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिली. संविधान कलम चारमध्ये अखंड भारताचा उल्लेख आहे. ७५ वर्षांपासून भारत अखंडच आहे आणि यापुढेही कायम राहिल यात तिळमात्र शंका नाही. म्हणूनच भारताची ओळख जगात “धर्मनिरपेक्षता’ म्हणून आहे असे मत अमरावतीचे पंकज भारतीय यांनी येथे बोलताना मांडले. भारतीय संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर व्याख्यान झाले. सम्यक विचार मंच यांच्या वतीने आयोजित मिलिंद व्याख्यानमालेत रविवारी फडकुले सभागृहात ते बोलत होते. डॉ. औदुंबर मस्के अध्यक्षस्थानी होते. आजही अनेक लोकांपर्यंत संविधान पोहोचले नाही. घरात असेल तर अनेकांनी तो वाचलाही नसेल. १९५० साली संविधान लागू (अंमलात) झाले. आपण नेहमी एकात्मतेबद्दल बोलतोय, याचे दोन अर्थ आहेत. एक भारतीय भौगोलीक स्थिती व वैचारिक मानसिकता. वैचारिक एकता म्हणजे बंधूता. संविधानातील कलम १ ते ४ हेच सांगते की,अखंड भारताची संकल्पना. भारताची एकता व अखंडता संविधानामुळे टिकून आहे हे विसरू नका, असे मत पंकज भारतीय यांनी मांडले. डॉ. बाबासाहेबांची चळवळ पुढे न्या .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आपण सगळ्यांनी पुढे नेण्याची गरज आहे. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचे विचार मनात रूजवा. पुढच्या पिढीला विचार पटवून द्या. .जाती, धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडा. जाती, धर्म, देव यावरून भांडण होत आहेत. प्रत्येकानी आपल्या धर्माच, देवाचं अनुकरण करावे. पण, अंधश्रध्दा मनात बाळगू नका. . कलम २५ – उप कलम ४ काय सांगते- सद॰सदविवेक बुध्दी- आपल्या बुध्दिला पटले तर धर्म स्विकारणे. जबरदस्ती नाही. आचरण- आपाआपल्या देवाचे, धर्माचे आचरण करा, पूजा करा. पण बंधन नाही. मुक्त प्रकटीकरण- ज्या धर्मात आपण राहतो, मानतो त्यावर परखड मत आपण मांडले पाहिजे.
Source link
नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे:प्रा. विजय माकणीकर