Headlines

जायकवाडीमधील 72 एमएलडी पाणी बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव:900 मिलिमीटर स्वतंत्र जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात




दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगाने होत आहे. उद्योगांची वाढती संख्या, देश-विदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी ७२ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते बिडकीन ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बिडकीन डीएमआयसी क्षेत्र भविष्यात औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर लागणारी पाण्याची मोठी गरज या योजनेमुळे पूर्ण होणार आहे. जायकवाडी प्रकल्पातून ऑरिकच्या औद्योगिक विकासासाठी एकूण १०० एमएलडी पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. यापैकी बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी ७२ एमएलडी पाण्याची स्वतंत्र तरतूद आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, उद्योगांना लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४२ टक्के पाणी हे सांडपाण्यावर अत्याधुनिक प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या अनेक कंपन्यांचे प्रकल्प बिडकीनमध्ये उभारणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर पाण्याची मागणी अनेक पटींनी वाढणार असल्याचेही सांगण्यात आले. प्रकल्प सुरू झाल्यावर पाण्याची मागणी वाढेल सध्या ऑरिक आणि एमआयडीसीत ३० एमएलडी पाणीपुरवठ्याचा करार आहे. सद्य:स्थितीचा विचार केला तर शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला ४ ते ४.५ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासत आहे, तर बिडकीन क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या उद्योगांना १ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, सध्या अनेक कंपन्यांचे प्रकल्प बिडकीनमध्ये उभारणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर पाण्याची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. वाळूजनंतर बिडकीन डीएमआयसी समृद्ध जायकवाडीचे पाणी केवळ शेतीसाठीच नव्हे, तर मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीसाठीही जीवनदायी ठरत आहे. वाळूजनंतर आता बिडकीन डीएमआयसीही याच समृद्ध जलस्रोताच्या बळावर विकासाचे नवे पर्व गाठण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली असल्याचे पैठणच्या नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर यांनी सांगितले. उद्योगांना पाणी, वीज उपलब्ध करण्यावर भर बिडकीन औद्योगिक पट्ट्यात देश-विदेशातील गुंतवणूकदारांचे प्रकल्प आकार घेत आहेत. पाणी, वीज आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधा उद्योगांना वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर आहे. डीएमआयसीच्या विकासात कोणतीही कमतरता पडणार नाही, अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. ३ लाखांपेक्षा अधिक रोजगारांची सुवर्णसंधी 1. ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीच्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आतापर्यंत ९० टक्के भूखंडांचे वाटप विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांना पूर्ण झाले आहे.
2. या क्षेत्रातील सर्व उद्योगांचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यानंतर थेट १ लाखांहून अधिक, तर अप्रत्यक्षरीत्या २ ते ३ लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
3. वाहननिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, प्रगत अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना अखंड पाणीपुरवठा करता येईल शेंद्रा आणि बिडकीन क्षेत्रासाठी सध्या एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेण्याचा करार आहे. ७२ एमएलडी पाणी राखीव ठेवले आहे. जायकवाडी ते बिडकीन ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. – महेश पाटील, ऑरिक सिटी अधिकारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *