![]()
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी संभाव्य आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. मंत्रालय, मरीन ड्राईव्ह आणि आमदार निवास परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून संभाव्य आंदोलकांची धरपकड सुरू झाल्याचे चित्र आहे. दोन दिवसापूर्वीच नोटीस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना यापूर्वीच प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 168 अन्वये ही नोटीस देण्यात आली होती. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच आंदोलकांना मंत्रालय परिसरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तुपकर यांनी पोलिसांच्या नोटिशीवर आक्रमक भूमिका घेत, अशा नोटिसांना घाबरत नसल्याचे सांगितले होते. तसेच 27 ऑगस्ट रोजी मुंबईतील आंदोलन होणारच, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये काय परिस्थिती निर्माण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय? शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर यांनी सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाऐवजी 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रमुख मागणी आहे.तसेच आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 2009, 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशीही मागणी केली आहे. कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करावे, तसेच मृत पात्र शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी तुपकरांनी केली आहे.याशिवाय ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) योजनेचा लाभ घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, याची सरकारने हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील इतर प्रश्नांवरही तुपकरांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. हेही वाचा.. नरहरी झिरवळांचा आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला:खाऊन-पिऊन आंदोलन करा; 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.सविस्तर वाचा..
Source link
रविकांत तुपकरांच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड:संभाव्य आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात, मंत्रालय-मरीन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त