![]()
जालना जिल्ह्यातील परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ९वीतील एका विद्यार्थ्याची अकरावीतील ७ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या अँटी-रॅगिंग कमिटीने दोषी ७ विद्यार्थ्यांना ८ दिवसांसाठी निलंबित केले. २ जुलै रोजी या मुलाने मारहाण, धक्काबुक्की करत कपडे धुवायला लावत त्रास दिल्याची तक्रार पालकांकडे केली होती. अँटी-रॅगिंग कमिटीकडून तातडीने कारवाईचे पाऊल विद्यार्थ्याने सुरुवातीला प्रशासनाकडे तक्रार केली नव्हती, थेट पालकांना माहिती दिली. पालकांनी तक्रार केल्यानंतर शाळेच्या अंतर्गत अँटी-रॅगिंग कमिटीने तातडीने चौकशी केली. या चौकशीत दोषी आढळलेल्या सातही विद्यार्थ्यांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. -एस. जी. पवार, प्रभारी मुख्याध्यापक
Source link
जालन्याच्या नवोदय विद्यालयात रॅगिंग:सात विद्यार्थ्यांचे निलंबन, 11 वीच्या विद्यार्थ्यांकडून 9 वीच्या विद्यार्थ्याचा छळ