Headlines

'सदा करवंद' वाणाची राज्यभरात दखल:वसमतच्या सदाशिव अडकिणेंना 'वसंतराव नाईक कृषी पुरस्कार'




वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांना राज्य शासनाचा कै. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार बुधवारी ता. 1 मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. करवंदाची कुंपन शेती अन सदा करवंदाचे वाण विकसीत केल्याच्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांनी शेतीला करवंदाचे नैसर्गिक कुंपण लावले. यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण झाले. या शिवाय सदा करवंद हे करवंदाचे वाण विकसीत करून करवंदाचे बारमाही उत्पन्न सुरु केले. राज्याबाहेरील मोठ्या कंपन्या करवंद खरेदी करतात. या शिवाय अडकिण यांनी करवंदावर प्रक्रिया करून चेअरी तसेच करवंद लोणचे व इतर खाद्य पदार्थ तयार केले आहेत.या पदार्थांनाही मोठी मागणी आहे. करवंदासह विविध वन्य फळांवरील प्रक्रिया उद्योग उभारणी, नर्सरी व्यवसायाचा विकास तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग यांची दखल घेऊन त्यांची कै. वसंतराव नाईक कृषी पुरस्कारासाठी निवड झाली होती. मुंबई येथे बुधवारी ता. 1 राज्याचे पर्यटन मंत्री भुराजे देसाई यांच्यासह जागतिक कीर्तीचे कृषी उद्योजक व संशोधक , वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या हस्ते अडकिणे यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगतात सदाशिव अडकीने यांनी करवंदासारख्या दुर्लक्षित फळावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. अल्पभूधारक शेतकरी असूनही सातत्याने संशोधनात्मक दृष्टीकोन ठेवून शेतीमध्ये विविध यशस्वी प्रयोग करणाऱ्या सदाशिव अडकीने यांच्या कार्याचा हा राज्यस्तरीय गौरव असल्याने हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नैसर्गिक कुंपण, फळ प्रक्रिया उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *