Headlines

कृषी दिनानिमित्त 21 प्रगतशील शेतकरी:पीक स्पर्धा विजेत्यांचा सत्कार; योजनांची दिली माहिती




माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते मातीपूजन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता (विस्तार) डॉ. प्रकाश घाटोळ यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक शेती, हवामान बदल, मृदा आरोग्य, जलव्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांचा लाभ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (कृषी) रोहित भेयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी (विस्तार) मिलिंद जंजाळ यांनी मानले. आयोजनासाठी मोहिम अधिकारी महेंद्रकुमार सालके, जिल्हा कृषी अधिकारी सुनंदा दळवी, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटोकार, सहाय्यक लेखा अधिकारी अनिल अंभोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गजानन नांदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सविता उद्धवराव महल्ले आणि प्रल्हाद नथ्थुजी नेमाडे यांनी आपल्या यशस्वी शेती प्रयोगांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *