![]()
राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा सेवाभावी संस्था, कान्हेरी सरप यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर त्यांच्
.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, डॉ. एम. एस. कुद्दुस, कमलकिशोर शर्मा, खोरीपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर वाकोडे, राहुल जाधव व रवींद्र गवई उपस्थित होते. या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला. यामध्ये थोरवी रवींद्र घायवट (९४.८०%), समीक्षा दीपक वानखडे (९२%), राशी सचिन बावस्कर (८३%), कोमल कृष्णा गवई (८०%) या विद्यार्थिनींसह प्रतीक्षा ढिसाळे, प्रीती सिरसाट, प्रांजली मोरे, हर्षदीप खंडारे, श्रेया इंगळे व उमेद डोंगरे यांचा समावेश आहे.
खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना गौरवण्यात आले. यात प्रबुद्ध समाज भूषण : मोहन शामत्कार, नितीन गोपनारायण. संगीत भूषण : राजू भाटी, विजय तेलमोरे. उद्योग भूषण : युसूफ अली झाकीर हुसेन. युवा भूषण : देवेंद्र लटुरिया. धम्म भूषण : राजेश खांडेकर. समाज भूषण : संजय मेश्राम. मानवाधिकार भूषण : हर्षा खंडारे. महिला संघ : मंदा इंगळे. प्रबुद्ध पाली लीपी पुरस्कार : शिलवंत डोंगरे. विधी भूषण : ॲड. भगवान दंदी, साहित्य भूषण : संजय डोंगरे यांचा समावेश आहे.