Headlines

तरुण पिढीला मोबाइलपासून दूर ठेवत मैदानावर आणावेत:कुलगुरूंनी केले आवाहन, विद्यापीठात उत्कृष्ट खेळाडूंचा केला सत्कार‎



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासाठी हे वर्ष सुवर्णमयी राहिले असून विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून पदके प्राप्त केली आहेत. या यशामध्ये सर्वांचा हातभार असून खेळाडू व क्रीडा शिक्षकांची खरी मेहनत फळाला

.

संलग्नित महाविद्यालयांतील क्रीडा संचालक तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षक यांच्याकरीता आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते पुढे म्हणाले, या कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि शारीरिक शिक्षकांची भूमिका सर्वांनी जाणून घेतली पाहिजे. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून नवीन माहिती आणि ज्ञान आत्मसात करुन त्यात कसा सकारात्मक बदल करता येईल, याचा विचार क्रीडा शिक्षकांनी करायला हवा. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. तनुजा राऊत व सदस्य डॉ. विकास टोणे उपस्थित होते.

उत्कृष्ट खेळाडू, चमू व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वॉडो (महिला), अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष व महिला), पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरुष), अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग (पुरुष व महिला), अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (महिला), अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो (पुरुष) या खेळांमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करुन उच्च स्थान मिळविल्याबद्दल उत्कृष्ट खेळाडूंचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संचालक डॉ. तनुजा राऊत, संचालन डॉ. शुभांगी दामले यांनी, तर आभार डॉ. प्रवीण डाबरे यांनी मानले. कार्यशाळा व पुरस्कार सोहळा कार्यक्रमाला पाचही जिल्ह्रातील संलग्नित महाविद्यालयातील शारीरिक शिक्षक, उत्कृष्ट खेळाडू, व्यवस्थापक, प्रशिक्षक, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

पुरुष गटात ऋत्विक कुडवे ठरला उत्कृष्ट खेळाडू शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा ऋत्विक कुडवे हा पुरुष गटात, तर महिला गटात श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची अनामिका डेका व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची क्षितीजा आठवले उत्कृष्ट खेळाडू ठरले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते ऋत्विक कुडवेला १० हजार तर अनामिका डेका व क्षितीजा आठवले यांना प्रत्येकी ५ हजार रु. रोख पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *