![]()
अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. सद्य परिस्थितीतील विविध परीक्षांमधील स्पर्धा व चढाओढ पाहता विद्यार्थ्यांनी व अतिशय परिश्रामने सातत्याने प्रयत्न केले यशप्राप्ती होईल, असे प्रमुख वक्ते प्रा. ललित काळपांडे म्हणाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश संघटक गणेश काळपांडे, उद्घाटक अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त सुभाष सातव, प्रमुख वक्ते प्रा. ललित काळपांडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बळीराम सिरस्कार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, कार्याध्यक्ष ॲड. महेश गणगणे, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश दाते, भाजप महानगरप्रमुख जयंत मसने, ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, उद्योजक उमेश मसने, उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, युवासेनेचे दीपक बोचरे, प्रा. नितीन देऊळकार, दिलीप गिऱ्हे, अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने, नगरसेविका शिल्पा वरोकार आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष सुभाष सातव यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकृष्ण बीरकड, प्रभाकर बोळे, सुखदेवराव मसने, विवेक गणोरकर, रामेश्वर तायडे, डॉ. राजकुमार वैराळे, दिलीप गिऱ्हे, प्रवीण तायडे, डॉ. प्रकाश वानखडे, माया काळपांडे, प्रणिता सम्रीतकार, पुष्पा बंड, जयश्री तडस, प्रा. अशोक भराड, प्रा. श्रीराम पालकर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. प्रकाश दाते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश भड, प्रा. अशोक रहाटे, वसंत ढोकणे, वैशाली रहाटे यांनी केले. आभार माधुरी दाते यांनी मानले.
Source link
सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास- प्रा. ललित काळपांडे:माळी महासंघाच्या वतीने गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार