Headlines

भिवंडी-कल्याण बायपासवर ट्रकला आग:मंत्री गिरीश महाजन यांची तत्काळ धाव, मदतीच्या केल्या सुचना




भिवंडी-कल्याण बायपासवर धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. दरम्यान, याच मार्गावरून जात असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक आदेश दिले.
भिवंडी-कल्याण बायपासजवळ आज दुपारच्या सुमारास वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचवेळी या मार्गावरून प्रवास करत असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही घटना आली.घटनेचे गांभीर्य लक्षात येताच मंत्री महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले वाहन थांबवून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस करून त्याला सुरक्षित अंतर राखण्यासह आगविझविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक आदेश दिले.
ट्रकला आग लागल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी वाहतूक पोलिसांनाही तातडीने वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. ट्रकचालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला, तर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पोहोचून मदतीच्या सूचना दिल्या. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावरील दृश्य.

हेही वाचा… मुंबईत 22 फूट उंच गणेश मूर्ती कोसळली, 2 ठार:5 जखमींत 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुली; भुलेश्वर स्थित मंडपात मूर्ती आणताना घडली दुर्घटना मुंबईतील भुलेश्वर भागात शनिवारी रात्री गणपतीची मूर्ती मंडपात नेली जात असताना एक मोठी दुर्घटना घडली. सुमारे २२ फूट उंच असलेली ‘भुलेश्वरचा राजा’ ही मूर्ती अचानक कोसळली. मूर्ती अंगावर पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले.सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *