![]()
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत. ‘जीवलगा, राहिले दूर घर माझे’ हे शांत शेळके यांनी लिहिलेले गाणे आशा भोसले यांनी गायले आहे. या गाण्याच्या वेळी घडलेला एक प्रसंग ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे. शांता शेळके लिहितात, आशा भोसले, माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बंगड्या घालणारी स्त्री अशी होती. जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले अहे; त्याच्या रेकार्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे. म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या ‘आमचे छोटे दादा’ यामध्ये आली आहे, पण जिभेने ती जरा तिखट असल्याचेही शांत शेळके यांनी लिहिले आहे. पुढे शांता शेळके लिहितात, आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे,थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या सोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे, स्वकष्टाने, जिद्दीने, धैयनि आणि कलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळवले आहे, अशी आठवण या पुस्तकात त्यांनी लिहिली आहे.
Source link
'जीवलगा' गाताना नेसली होती फाटकी साडी:शांता शेळके यांनी उलगडले आशाताईंच्या स्वभावाचे अनोखे पैलू, पुस्तकातून सांगितलेले अनेक किस्से