![]()
काही दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरातील एका दुर्घटनेवर हसल्याचा अमित साटम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून राज ठाकरे यांनी साटम आणि भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित साटम यांनी थेट राज ठाकरे
.
मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा: बॅनरला फासले काळे
अमित साटम यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी साटम यांचा खरपूस समाचार घेतला. “तुम्ही प्रत्यक्ष फिल्डवर असल्याचा दावा करता, मग तरीही अपघात का झाले?” असा बोचरा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. या शाब्दिक चकमकीनंतर आज मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला.
भांडुपमधील डीएव्ही महाविद्यालयाबाहेर मनसैनिकांनी अमित साटम यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. आंदोलक कार्यकर्त्यांनी साटम यांच्या बॅनरला काळे फासून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
काय म्हणाले होते अमित साटम?
काही दिवसांपूर्वी अमित साटम यांनी विरोधक केवळ लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले होते, “आम्ही केवळ बोलत नाही, तर विधानसभेत आवाज उठवून दोन दिवसांत महापालिकेच्या ७ अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यावर उतरून काम करताना पाहिले आहे का? मला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील गेल्या २५ वर्षांचे ‘अंडरस्टँडिंग’ (भ्रष्टाचार) आणि मलिद्याचे राजकारण आम्ही कायमचे बंद केले आहे.”
हे ही वाचा…
रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; छत्तीसगडमध्ये घरांमध्ये पाणी शिरले; गुजरातमध्ये कार वाहून गेली
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग पकडला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झेनिथ धबधब्यात पाण्याची पातळी अचानक वाढली. यात 100 पर्यटक अडकले होते, त्यांना दोरीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या जुनागढमध्ये अनेक भागांत 4 फुटांपर्यंत पाणी साचले. रस्त्यावर होड्या चालवाव्या लागत आहेत. भावनगरमध्ये एक कार पाण्यात वाहून गेली. सविस्तर वाचा…
‘आम्ही रस्त्यावर, ते फक्त पोस्ट टाकतात’:अमित साटमांचा राज ठाकरेंना टोला, संदीप देशपांडेंचा पलटवार- तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर असणं नव्हे
मुंबईतील मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरण आणि महापालिकेच्या कामकाजावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे हसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच आज राज ठाकरे यांनी या असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. आता अमित साटम यांनी पावसामुळे जलमय झालेल्या रोडची पाहणी करताना विरोधकांवर निशाणा साधला. “आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो, घरात बसून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला. सविस्तर वाचा…