Headlines

Kurla Tree Fall Death; Mumbai BMC Anger Over Negligence



पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत धोकादायक झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. या घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला येथे एका दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घ

.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर रविवारी अचानक एक भलेमोठे झाड कोसळले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ पालिकेला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत युनूस कुंडावाला (वय ६३) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या फौजिया रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आरे कॉलनीत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

दरम्यान ४ जुलै रोजी आरे कॉलनीमध्ये देखील अशीच एक घटना घडली. मुसळधार पाऊस सुरू असताना युनिट क्रमांक १३ च्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला. कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद (वय १८) हा तरुण मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना अचानक झाडाची एक मोठी फांदी त्याच्या थेट डोक्यावर कोसळली. या जोरदार फटक्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (A.D.) नोंद केली आहे.

मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरूच

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या विविध भागात झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच असून जीवितहानी व वित्तहानी होत आहे. नॅशनल सर्वोदय शाळेबाहेर नुकतीच झाडाची फांदी पडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. मात्र, गेल्याच आठवड्यात याच परिसरात स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे शालेय परिसरात पालकांची चिंता वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी सांताक्रूझमध्ये झाड पडून आठ जण जखमी झाले. तर, रविवारी दादरमध्ये घराच्या छतावर झाड पडून फांदी थेट घरात शिरल्याचा थरार घडला. तर सायन, माहीमसह काल पवई हिरानंदानी आणि विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये, तर आज घाटकोपर येथेही झाडे कोसळल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

पालिकेचा उद्यान विभाग पावसाळ्यापूर्वी करत होता काय?

पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचा आणि सर्वेक्षण करण्याचा दावा महापालिकेकडून दरवर्षी केला जातो. मात्र, शहरात दररोज घडणाऱ्या या प्राणघातक दुर्घटना पाहता, “मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग पावसाळ्यापूर्वी नेमकी कसली तयारी करत होता?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आणखी किती जणांना नाहक जीव गमवावा लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

हे ही वाचा…

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.