Headlines

स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून परिक्षा वेळेत घ्यावात:छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थीनींनी मांडल्या व्यथा




शासनाने स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करावे तसेच या परिक्षा ठरलेल्या वेळेतच घ्यावात अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी रविवारी ता. ५ आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमात व्यक्त केली आहे. यावेळी विद्यार्थीनींनी परिक्षेची तयारी करतांना येणाऱ्या अडचणी व व्यथा मांडल्या. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, शेतकरी नेते रमेश शिंदे, बंटी नागरे, भास्कर पोले, जुबेर मामू, विठ्ठल जाधव, शेख, संजय गुहाडे, किसन जुमडे, दत्तराव जाधव, शशिकांत कांबळे, अनुप नायक, पीयूष सोनी, दिपक सोनुळे, अमन शेख, वाजिद बेग, अतुल नायक, सतिश चिभडे, वैभव इंगळे, रिया पिंपरे, प्राची नागरे, दशरथ फोले यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी व विद्यार्थीनींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटनानंतर परिक्षा लांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो, अभ्यासातील लक्ष कमी होते परिणामी परिक्षेत अपेक्षीत यश मिळत नाही. त्यामुळे पेपरफुटीवर ठोस उपाय योजना करावी तसेच स्पर्धा परिक्षा वेेळेतच घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. परीक्षा शुल्क देखील कमी केले पाहिजे असे मत विद्यार्थ्यांनी मांडले. विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त करतांना त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यामध्ये पेपर फुटीनंतर पुन्हा अभ्यास पुन्हा घरच्यांचे मन वळविणे यागोष्टी कराव्या लागतात. ग्रामीण भागातून परिक्षेसाठी एक दोन वेळेस संधी दिले जाते त्यानंतर थेट लग्नाचाच विचार होतो. त्यामुळे दरवर्षी किमान तीन वेळा परिक्षा घेतल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व मागण्यांना योग्य स्वरूप देऊन शासन व संबंधित यंत्रणेकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील, असे आश्वासन हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पुचपते यांनी दिले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *