![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील रुपुर येथील तरुणाने मावशीच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. ५ दुपारी उघडकीस आली आहे. नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील रुपुर येथील अर्जुन शिवाजीराव गिते (२४) हा घरी एकुलता एक होता. आई, वडिल शेती करत असून अतिशय कष्टाने अर्जुन याला शिक्षण दिले. अर्जुन हा देखील अभ्यासात हुशार होता. बी. ए.ची पदवी मिळविल्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षा व पोलिस भरतीची तयारी सुरु केली होती. मात्र पोलिस भरतीमध्ये त्याला अगदी काही गुणांनी यशाने हुलकावणी दिली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. दरम्यान, नेहमी प्रमाणे तो शनिवारी ता. ४ रात्री घराच्या शेजारीच असलेल्या मावशीच्या घरी अभ्यासाला गेला होता. घरी कोणीही नव्हते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपार पर्यंत तो घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी मावशीच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अर्जुन याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ, किशोर पारिसकर, अभिजीत कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मयत मयत अर्जुन याचा मृतदेहावर औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. मयत अर्जुन याच्या पश्चात आई, वडिल असा परिवार आहे. कुटंुबातील एकुलता एक मुलगा गेल्याने गिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Source link
रुपुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल, औंढा नागनाथ पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी