![]()
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून सोमवारी हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे. पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी रामकृष्ण हरीच्या गजरात पालखी निघाली. यावेळी संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालखी सोहळ्यात चालक प्रमुख म्हणून बळीराम सोळंके काम पाहणार आहेत. या पालखी सोहळ्यात किर्तनकार, गुणीजन मंडळी, मृतदंगाचार्य सहभागी झाले आहेत. पालखी सोहळ्याचे पूजन झाल्यानंतर गावातून नगर प्रदक्षिणा घेण्यात आली. या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले असून पालखी सोहळा सोमवारी ता. ६ दुपारी हिंगोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी रामलिला मैदानावर पहिले रिंगण होणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हिंगोली नगर पालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून नांदेडनाका येथे नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत केले जाणार आहे. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, पालिकेचे गटनेते श्रीराम बांगर, अशोक नाईक यांच्यासह नागरीकांची उपस्थिती राहणार आहे. या पाच ठिकाणी रंगणार रिंगण सोहळा या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण सोमवारीता. ६ हिंगोली येथे होणार आहे. त्यानंतर ता. १२ जुलै सकाळी ९ वाजता दैठणा, ता. १४ जुलै दुपारी चार वाजता परळी वैजनाथ, ता. १५ जूलै दुपारी चार वाजता अंबाजोगाई, ता. १७ जुलै सकाळी १० वाजता जवळबन येथे होणार आहे. पालखी सोहळ्याचा असा असेल मुक्काम
Source link
संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष