![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे तंतोतंत अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन सामाजिक विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशनच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील स्मारकात विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. सय्यद बोलत होते. पुढे बोलताना डॉ. सय्यद यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी महात्मा फुलेंचे शैक्षणिक धोरण, महिला सक्षमीकरणाचा लढा आणि तत्कालीन सामाजिक सुधारणांचा विस्तृत विचार उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला. समाजातील तळागाळातील घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी फुलेंनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी हभप सिद्धिनाथ मेटे महाराज, लेखक सचिन मोहन चोभे, कर्मलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा मार्या थोरात, ज्ञानकौशल्य ट्रस्टच्या सचिव माधुरी चोभे, भारती गवळी, पायल बडबडे, आणि प्रिया धामणे आदी उपस्थित होते. आभार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी मानले.
Source link
महात्मा फुलेंच्या विचारातून समताधिष्ठित समाज निर्मिती शक्य:डॉ. महेबूब सय्यद