![]()
संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथील पालखी ओटा परिसराची रविवारी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण पालखी स्वच्छ करण्यात आला. ही मानाची पालखी मंगळवारी (७ जुलै) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी हा पैठणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरवशाली सोहळा आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेदरम्यान आणि नियोजन बैठकीत शहादेव लोहारे, ऋषी आहेर यांच्यासह अनेक नाथभक्तने उपस्थित होते. विविध सोयी-सुविधांची व्यवस्था वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास पिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि कचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात आली आहेत. नगरपालिका प्रशासन वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे नगराध्यक्ष कावसानकर यांनी सांगितले. याशिवाय प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधांची व्यवस्था केली आहे.
Source link
विठ्ठलनामाचा गजर:7 जुलै रोजी पंढरपूरकडे पालखीचे होणार प्रस्थान, पैठण येथील पालखी ओट्याची स्वच्छता