- Marathi News
- National
- UPSC: 539 Applications Rejected Before Prelims With The Help Of AI, Forms Scrutinized From 15 year old Database
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

यूपीएससीने (केंद्रीय लोकसेवा आयोग) नागरी सेवा परीक्षा-२०२६ च्या प्रीलिम्समध्येच एआय वापरून ५६९ अपात्र अर्ज बाद केले. यासाठी आयोगाने १५ वर्षांचा डेटा एआयद्वारे प्रोसेस केला. अर्ज बाद करण्याच्या कारणांमध्ये एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करणे, वयोमर्यादा ओलांडणे, प्रवर्ग बदलणे व प्रयत्नांची संख्या ओलांडणे यांचा समावेश होता. २४ मेच्या सीएसईसाठी ८.१८ लाखांनी अर्ज केले होते. प्रिलिम्ससाठी ४.४९ लाखच पोहोचले.
प्रथमच… ३० मिनिटे आधी फेस ऑथेंटिकेशन
यूपीएससीने प्रथमच प्रिलिम्सच्या ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर अर्जदारांचे फेस ऑथेंटिकेशन केले. फॉर्म भरताना वेबकॅम किंवा मोबाइलवरून लाइव्ह फोटो देण्याची सक्ती केली. छाननीसाठी अर्जदारांकडून आधार नंबर मागितले. ९४% अर्जदारांनी अर्जातच आधार नंबर दिले. गत परीक्षेच्या तुलनेत प्रवर्ग बदलल्याबद्दल ४३,४९७ जणांना ई-मेलद्वारे कारण विचारण्यात आले. प्रवर्ग बदलल्यामुळे उमेदवाराची नंबर ऑफ अटेम्प्ट बदलते.